Sanjay Raut Allegations on Navneet Rana esakal
महाराष्ट्र बातम्या

हनुमान चालिसा प्रकरणामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन : संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालिसा वाचण्यासाठी मुंबईत गोंधळ घातला. त्यानंतर शिवसैनिक देखील आक्रमक झाले होते. आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut Allegations on Rana) यांनी राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुंबईत हनुमान चालिसा आणि भोंगे प्रकरणातून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचं तपासातून समोर येतंय, असं संजय राऊत म्हणाले.

राणा दाम्पत्य अचानक रामभक्त आणि हनुमान भक्त झाले. भक्तीमध्ये इतके बुडाले की त्यांनी मुंबईत येऊन धिंगाणा घातला. त्यांनी मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. हनुमान चालिसेवरून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. १९९२ च्या दंगलीत पाकिस्तान, डी गॅंग कनेक्शन, माफिया टोळींचं कनेक्शन होतं. तसंच कनेक्शन या हनुमान चालिसा प्रकरणामागे आहे, असं तपासातून समोर आलं आहे. पोलिसांना देखील असंच दिसत आहे. मुंबईत घडणाऱ्या घडामोडींमागे डी-गँग, अडरवर्ल्ड कनेक्शन आहे, असं राऊत म्हणाले.

लकडावाला डी-गँगचा मुख्य फायनान्सर होता. त्याचे आणि राणा दाम्पत्याचे संबंध कसे आहेत? हे समोर आलं आहे. मग ईडीने त्यांची चौकशी का केली नाही? डी गँगसोबत संबंधित लोकांकडून पैसे घेणाऱ्यांची चौकशी का करण्यात आली नाही? अनिल देशमुख, नवाब मलिकांची चौकशी केली. मग राणा दाम्पत्य का सुटलं? त्यांना वाचविणाऱ्या कोणत्या आंतरराष्ट्रीय शक्ती आहे? त्यांची अनेक प्रकरणं आहेत. ती मी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली आहेत. ते लवकरच पुढे पाठवतील, असंही संजय राऊतांनी सांगितलं.

राणा दाम्पत्यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिणार आहे. कुठल्याही पक्षाने अशा डी-गँगसोबत कनेक्शन असलेल्या लोकांसोबत उभे राहू नये. देवेंद्र फडणवीस का गप्प बसले आहेत? त्यांनी नवनीत राणांसोबत पोलिस ठाण्यात जातीभेद केल्याचं म्हटलं होतं. पण, मुंबई पोलिसांनी व्हिडिओ जारी केल्यानंतर फडणवीस का बोलले नाही? भाजपचे पोपट का बोलत नाही? असे सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT