shivsena leader mp sanjay raut  sakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊतांवरील सुनावणीवरून हायकोर्टाने बार असोसिएशनला फटकारलं

या याचिकेमध्ये मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी आणि गृहमंत्री वळसे पाटील हेदेखील प्रतिवादी आहेत.

सकाळ डिजिटल टीम

संजय राऊत यांच्यावर दाखल असलेल्या अवमान याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. आमचे खांदे भक्कम आहेत, ज्यांना टीका करायची आहे, त्यांना करू द्या, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी इंडियन बार असोसिएशनने संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

या याचिकेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे तिघेही प्रतिवादी होते. भाजपा नेत्यांना दिलासे मिळत असून महाविकास आघाडीच्या नेत्यांना मात्र न्यायालय वेगळा न्याय देत आहे, अशा आशयाची विधानं संजय राऊत यांनी केली होती. तसंच सामनाच्या अग्रलेखातूनही त्यांनी अशाच प्रकारची भूमिका मांडली होती. यावरूनच बार असोसिएशनने त्यांच्याविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची भूमिका मांडली होती.

ही याचिका उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी सादर करण्यात आली. पण हा न्यायालयाचा कामाचा शेवटचा आठवडा आहे. त्यानंतर न्यायालयाला सुट्टी असणार आहे. त्यामुळे तातडीने सुनावणीची गरज नाही. ज्यांना टीका करायची त्याला करू दे, जोपर्यंत आमचे खांदे भक्कम आहेत, तोपर्यंत अशा विषयांकडे लक्ष देण्याची किंवा त्यांची दखल घेण्याची गरज नाही, अशी भूमिका न्यायमूर्ती दिबंकर दत्ता यांनी घेतली आहे. मात्र तरीही वकिलांच्या विनंतीनंतर जून महिन्यात ही सुनावणी होईल, अशी माहिती हाती येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E. Coli Bacteria: मुंबई रेल्वे स्थानकातील पाणी पिताय, जरा जपून! मध्य रेल्वेच्या ३ स्थानकात पाण्याच्या टाकीत आढळतोय 'हा' भयानक विषाणू

IND vs SL 1st Test: 'आता, सर्व तलवार चालवणार!'; रिषभ पंत लाईव्ह मॅचमध्ये रवींद्र जडेजाला असं का म्हणाला? Video Viral

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन बांगलादेशी ताब्यात; अनधिकृत वास्तव्य उघड, ढाब्यावर कुक-वेटर म्हणून काम, धक्कादायक सत्य समोर..

Marathi News Live Updates : रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती

Nag Panchami 2026: पृथ्वीवर नागकुळाची निर्मिती कशी झाली? जाणून घ्या नागदेवतेच्या जन्माची अद्भूत कथा..

SCROLL FOR NEXT