Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: राऊतांच्या 'त्या' पुस्तकांमध्ये नेमकं काय? जेलमध्ये लिहिली दोन पुस्तकं

संतोष कानडे

मुंबईः काल संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका झाली. यानंतर राऊत यांनी 'मातोश्री'वर जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्री निवासस्थानी एकत्रितपणे माध्यमांशी संवाद साधतांना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.

जेलमध्ये असतांना काय केलं? या प्रश्नाचं उत्तर देतांना संजय राऊत म्हणाले की, आतमध्ये असतांना मी दोन पुस्तकं लिहिली आहेत. वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या वाचल्या, जी पुस्तकं वाचली आणि ज्या काही आवडत्या गोष्टी लिहून ठेवल्या त्याची पुस्तकं लिहिणार आहे. शिवाय आलेल्या अनुभवांची डायरदेखील लिहिलेली असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचाः कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

तुरुंगात असतांना एका बातमीची आठवण राऊतांनी सांगितली. ''केरळमध्ये एका मंदिरात एक मगर रहायची. पण ही मगर शाकाहारी होती. जेव्हा तिची मृत्यू झाला तेव्हा मंदिर व्यवस्थापनाने या मगरीची अंत्ययात्रा काढून हिंदू पद्धतीने अंत्यविधी केला.'' ही बातमी आपल्याला आवड्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत पुढे म्हणाले की, तुरुंगामधलं जीवन म्हणजे फक्त एकांतवास असतो. समोर फक्त भिंत दिसतं. माणूस दिसत नाही. असा अनुभव कुणालाही येऊ नये, असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT