Sanjay Raut  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरणी संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र

संजय राऊतांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी जिह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली. वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. ही घटना अपघात आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु ही हत्या असल्याचे उघड झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

वारिशे यांच्या हत्येप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. ”राज्याचे गृहमंत्री म्हणून ढासळणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. आपल्यासारख्या प्रशासनाचा मोठा अनुभव असलेल्या नेत्याकडे गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्यात दिवसाढवळ्या खून पडावेत व संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा, हे चिंताजनक आहे.” असे राऊत यांनी या पत्रात लिहलं आहे.

कोकणातील नाणार रिफायनरीविरुद्ध लोकांमध्ये जागृती करणाऱ्या पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या होते. हे धक्कादायक आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहविभागाचे नेतृत्व करीत असताना राज्यात खून होत आहेत. संबंधित गुन्हेदारांना राजाश्रय मिळावा, हे भीषण आहे अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राजापूर येथील तरुण पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघात नव्हे तर ती हत्याच आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी ही घटना आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना याबाबत इशारा देणारे पत्र लिहिले आहे. तसेच लवकरच मी आणि शिवसेनेतील सहकारी रत्नागिरी, राजापूर येथे जाणार आहोत, अशी माहितीही राऊतांनी दिली आहे.

तर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात कसं नेता येईल आणि याचा लवकरात लवकर तपास पूर्ण केला जाईल असं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khan Sir Firing Case: गोळीबारप्रकरणी खान सरांनाच अटक होण्याची शक्यता; दोन्ही अंगरक्षकांनी गोळीबाराची दिली कबुली

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

संजू राठोडच्या 'गुलाबी साडी' गाण्यासाठी अभिनेत्रीला किती पैसे मिळाले? प्राजक्ता म्हणाली, 'चांगला मित्र म्हणून त्याने...'

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

SCROLL FOR NEXT