sanjay raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : दत्ता दळवींचा मुलगा संजय राऊतांच्या भेटीला; राऊतांनी काढला अब्दुल सत्तारांचा 'तो' मुद्दा

संतोष कानडे

मुंबईः उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. त्यामुळे त्यांना अटक झाली असून त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एका कार्यक्रमात बोलताना दळवी यांनी अपशब्द वापरले होते.

त्यानंतर बुधवारी रात्री उद्धव ठाकरे गटाची 'मातोश्री'वर एक महत्त्वाची बैठक पार पडली. गुरुवारी सकाळी दत्ता दळवी यांचा मुलगा संजय राऊतांच्या भेटीसाठी दाखल झाला आहे. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर खालच्या शब्दांमध्ये टीका केली.

संजय राऊत म्हणाले की, राज्यात अस्मानी संकट कोसळलं असताना या राज्याचे सुलतान, एक मुख्य सुलतान... दोन डेप्युटी सुलतान कुठे आहेत? प्रचाराला फिरताहेत तेलंगणा, राजस्थान आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर फिरताहेत.

दत्ता दळवी प्रकरणात बोलताना राऊत म्हणाले की, दत्ता दळवी तुरुंगात आहेत. त्यांचं कुटुंब घरात होतं. दोन-चार षंढ आले आणि गाडी फोडली. भाड्याचे लोक आणून हल्ले केले जात आहेत. गाड्या फोडणारे पळून का गेले? थांबायचं होतं ना. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना अपशब्द वापरले होते, दुसरे प्रकाश सुर्वे नळ्या तोडण्याची भाषा करतात; एकाला वेगळा न्याय अन् दुसऱ्याला वेगळा न्याय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, दत्ता दळवी यांचा मुलगा योगेश दळवी संजय राऊत यांच्या भेटीला गेला आहे. सुनील राऊत हे दत्ता दळवी यांच्या मुलासह त्यांच्या कार्यालयात गेले. दळवी प्रकरणात ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार टीका केली जातेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT