MP Sanjay Raut sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut News : रेकॉर्ड ब्रेक शब्द कमी पडेल; उध्दव ठाकरेंच्या मालेगावातील सभेपूर्वी संजय राऊतांची गर्जना

सकाळ डिजिटल टीम

खेड येथे झालेल्या भव्य सभेनंतर आज (दि.२६) उद्धव ठाकरे यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. एमएसजी महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता ही सभा आयोजित करण्यात आली असून उद्धव ठाकरे या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दरम्यान सभेविषयी बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.

राऊत काय म्हणाले..

उद्धव ठाकरेंच्या या सभेविषयी बोलताना राऊत म्हणाले, मालेगावच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे नाहीतर देशाचे लक्ष लागले आहे. मला आताच दिल्लीच्या काही नेत्यांचे फोन आले. सगळीकडे सभेची चर्चा आहे. देशात आणि महाराष्ट्रात जे सुरु आहे त्यावर उद्धव साहेब काय बोलतील याकडे सर्वांच लक्ष आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, स्वतः मी आणि विनायक राऊतसाहेब या सभेचे काम पाहत आहे. रेकॉर्ड ब्रेक शब्द हा कमी पडेल अशी सभा होईल आणि इथे भाड्याने कोणी येणार नाही. दीडशे रुपये भाड्याने देऊन कोणी येणार नाही. असे लोक येतात आणि समोर प्रमुख भाषणं सुरू झाली की निघून जातात. या सभेसाठी काही संस्थानी सुट्या दिल्या आहेत असे देखील राऊत यांनी सांगितले.

मालेगावात उद्धव ठाकरे यांचे उर्दू भाषेतील पोस्टरवर बोलताना राऊत म्हणाले की, देशात उर्दू भाषा नाही का? त्यांनी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन केलेल्या वक्तव्याचे देखील कौतूक केले. भाषेच्या संदर्भात चित्त विचलित करू नका, लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर या सभेमुळे लोकांची हात भर फाटली आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच मालेगावात येत आहे. त्यामुळे त्यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सभे ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रातून लाखो शिवसैनिक सभेला हजेरी लावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सभास्थळी एक लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान या सभेत उद्धव ठाकरे देशात सुरू असलेल्या राजकीय परिस्थीतीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT