Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : शेंडी-जानव्याचे नाही आम्हाला सावरकरांचे विज्ञानवादी हिंदुत्व मान्य ; ठाकरे गटाच्या नेत्याचे वक्तव्य!

सकाळ डिजिटल टीम

'सावरकर विरुद्ध गांधी' असे राजकारण सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. 'मी सावरकर नाही, मी गांधी आहे' या राहुल गांधींच्या वक्तव्यावर शिंदे-फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर 'महाविकास आघाडी'तील प्रमुख घटक पक्षाचे उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका झाली. 

राहुल यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर झालेल्या कारवाईबाबत काँग्रेस लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, तर दुसरीकडे भाजपने सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल यांना घेरण्यास सुरुवात केली आहे.

भाजप आणि संघ परिवराचा काहीही सबंध नव्हता. संघ परिवाराने सावरकरांना काय शत्रू मानले होते तसेच त्यांना वाळीत टाकले होते. मुख्यमंत्री वीर सावरकरांवर काही बोलू शकत नाहीत. ते एका कागदावर लिहून दिलेले वाचून दाखवतात. सत्ताधारी अडानी बचाव यात्रा काढत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. या ढोंग्यांनी आम्हाला सावरकर सांगायचा प्रयत्न करू नये, असे देखील राऊत म्हणाले. 

आमचं शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नसून आम्हाला सावरकरांचे विज्ञानवादी हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. आम्हाला भाजपने सावरकर सांगू नये. सावरकरांची गोमातेवरची भूमिका भाजपला मान्य आहे का?, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे यांना बाहेर पडण्याची गरज आहे, असल्याचे भाजप नेते म्हणतात. यावर संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना महाविकास आघाडी असल्यामुळे शंभर टक्के सत्तापरिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडीत सर्वांनी सावरकरांची भूमिका मान्य केली आहे. काँग्रेसने सावरकरांचे पुस्तके वाचावी, असे राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT