Sanjay Raut Warned BJP sakal
महाराष्ट्र बातम्या

'राजकीय गुन्हेगारांच्या कॉलरला...', संजय राऊतांचा भाजपला इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना गृहखात्यावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर संजय राऊतांनी (Sanjay Raut on Shivsena NCP Dispute) प्रतिक्रिया दिली आहे. तिन्ही पक्षाचं सरकारचं उत्तमरित्या काम सुरू आहे. आम्ही सुडाच्या भावनेनं कारवाई करणार नाही. पण, कायद्याच्या मार्गानं राजकीय गुन्हेगारांच्या कॉलरला योग्य वेळी हात घालू, असा इशारा संजय राऊतांनी भाजपला (Sanjay Raut Warned BJP) दिला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणासारख्या राजकीय सुडानं महाराष्ट्र सरकार कारवाई करणार नाही. आम्ही कायद्यानं कारवाई करू. आमचं कायद्याचं राज्य आहे. भाजपला जशाच तसे उत्तर देणं गरजेचं आहे. हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांपासून सर्वांचं मत आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असावं त्यामुळे राज्याचा गाडा हाकणे सोयीस्कर होतं. पण, तिन पक्षांच्या सरकारमध्ये ते शक्य नाही. मुख्यमंत्री सर्व खात्यांचे प्रमुख आहेत. तसेच भाजपच्या नेत्यांवर मुख्यमंत्र्यांचं बारी लक्ष आहे. कायद्याच्या मार्गानं योग्य वेळी राजकीय गुन्हेगारांच्या कॉलरला हात घालणार, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद हवंय, असा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. त्यावरून संजय राऊतांनी मुनगंटीवारांवर टीका केली आहे. सुधीर मुनगंटीवारांना मध्ये नाक खुपसायची काय गरज आहे. राष्ट्रवादीला मुख्यमंत्री हवंय, हे ठरविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय. हे तुमचं काम नाही. या फुसुकल्या सोडण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे वातावरण दुषित होईल, असं वाटत असेल. पण, असं होणार नाही. कारण तिन्ही पक्षांचा एकमेकांवर विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.

आमच्या सरकारमध्ये अजिबात विसंवाद नाही. सर्व तिन्ही पक्षांमध्ये सुसंवाद आहे. आमच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं आदानप्रदान सुरू आहे. मुख्यमंत्रिपद कोणाला पाहिजे नसतं? भाजपला देखील मुख्यमंत्रिपद हवंय आहे. त्यामुळे त्यांनी सेनेसोबतची युती तोडली. महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपद पाच वर्ष शिवसेनेला दिलं आहे. हे भाजपने समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी उगाच त्रास करून घेऊ नये. मानसिक त्रास जास्त झाला तर मानसिक, हृदयविकाराचा झटका येतो. अडीच वर्ष आम्हाला सुखानं जगू द्या, अशी टीका देखील राऊतांनी भाजपवर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT