Milind Narvekar esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : मिलिंद नार्वेकर ठाकरेंची साथ सोडणार? अख्ख्या ठाकरे कुटुंबाची सुरक्षा काढली पण नार्वेकरांना सूट

संतोष कानडे

मुंबईः राज्य सरकारने ठाकरे कुटुंबाची सुरक्षा काढली आहे. उद्धव ठाकरेंना असलेली झेड प्लस सुरक्षा काढून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. या सगळ्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेला धक्का लावण्यात आलेला नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

राज्य सरकारकडून ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात केल्याचा प्रकार समोर आळा आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांची सुरक्षा कमी खरण्यात आली आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅन देखील केल्या कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

उद्धव ठाकरे यांना झेड प्लस आणि आदित्य ठाकरे यांना वाय प्लस सुरक्षा होती. फक्त कुटुंबियांचीच नव्हे तर 'मातोश्री'च्या जवळपासच्या परिसरातील देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. 'मातोश्री'वर मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गेटवर पोलिस तैनात असतात मात्र आता ती सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

ठाकरे कुटुंबियांची आणि 'मातोश्री'ची सुरक्षा कमी केल्यानंतरही शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना सचिव तसेच उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहतात.

आता मिलिंद नार्वेकर यांना उद्धव ठाकरे यांनी बाजूला करुन रवी म्हात्रे उद्धव ठाकरेंच्या आसपास दिसतात. मिलिंद नार्वेकर ठाकरेंची साथ सोडणार अशीही चर्चा झाली होती. परंतु अजूनही ते ठाकरे यांच्या सोबत आहेत. परंतु सर्व कुटुंबाची सुरक्षा काढूनही मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा ठेवण्याचे पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! झिम्बाब्वेत सूर गवसला... ४ चौकार, ४ षटकारांसह अर्धशतक ठोकून गाजवले मैदान

Latest Marathi Update : ते घाबरले आहेत, म्हणूनच त्यांनी बॅरिकेड्स लावले - राजीव शुक्ला

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

Mumbai Rain: राज्यात पावसाचा कमबॅक! ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, पालघरसह 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Guru Purnima 2026: 28 की 29 जुलै? यंदा गुरुपौर्णिमा नेमकी कधी? उदयतिथीनुसार जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT