Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : लग्न होत नसल्यामुळे पवारांना मारण्याची धमकी; तपासातून धक्कादायक खुलासा

फेसबुक पोस्ट करून तुमचा दाभोळकर करू अशी धमकी देण्यात आली होती.

दत्ता लवांडे

पुणे : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मारण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार घडला होता. तुमचा दाभोळकर करू अशी धमकी फेसबुकवरून देण्यात आली होती. 'राजकारण महाराष्ट्राचे' या फेसबुक पेजवरून ही धमकी दिल्याप्रकरणी सागर बर्वे या तरूणाला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या फेक अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती. पण या पाठीमागे सागर बर्वे या तरूणाचे कोणतेही राजकीय कनेक्शन पोलिसांना सापडले नाही. त्याच्या या कृत्यामागे वेगळेच कारण असल्याची माहिती मिळाली आहे. सागर बर्वे हा अविवाहीत असून त्याचे लग्न होत नसल्यामुळे तो तणावात असल्याची माहिती आहे.

लग्न होत नसल्याच्या तणावातच महाराष्ट्रात औरंगजेबाच्या फोटोवरून पेटलेल्या वादामुळे त्याला राग आला आणि त्यातूनच त्याने फेसबुकवर ही पोस्ट केली असल्याचं समोर आलं आहे. ही पोस्ट करण्यामागे माझा कोणताही हेतू नसल्यांच त्याने पोलिसांनी सांगितलं आहे. पण पवारांनाच धमकी का दिली? यासंबंधित अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, सौरभ पिंपळकर नावाच्या ट्वीटर अकाउंटवरूनही शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. त्याच्या बायोमध्ये "मी भाजपचा कार्यकर्ता असून मी धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार करतो" असं लिहिलं आहे. त्यामुळे हा भाजपचाच कट असल्याचा आरोप अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT