Ajit Pawar Sharad PAwar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : वय ८२ असो वा ९२ मला फरक पडत नाही; शरद पवारांनी स्पष्ट केले इरादे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून अजित पवारांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवाय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी दावा केला आहे. त्यांचा दावा मजबूत करण्यासाठी त्यांनी दोन दिवसआधीच निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आता हे प्रकरण दिल्लीत पोहोचलं असून शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार यांनी यावेळी आपले इरादे स्पष्ट केले. पक्षाला उभ करून मजबूत स्थितीत नेण्याची आमची मानसिकता आहे. आजची बैठक आमची हिंमत वाढवणारी होती. आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त केलं हे मला माहित नाही. पण राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच असून इतर दाव्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं पवारांनी सांगितलं.

वयावर प्रश्न उठवणाऱ्या अजित पवारांना प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मी अजुनही सक्रीय आहे. मग ८२ काय आणि ९२ काय मला फरक पडत नाही, असंही पवार म्हणाले. अर्थात पवारांनी वयाच्या ९२ पर्यंत सक्रिय राहण्याचे संकेत दिले आहे. तसेच शरद पवार यांनी निवडणूक आयोगात जाण्याऐवजी, सुप्रिम कोर्टात जाण्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्याची वेळ येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. तसेच त्यांनी आराम करून मार्गदर्शन करावे, असंही म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT