Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: ‘साहेब आणि दादा आजही एकत्रच, काळजी करू नका’, अजित पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर ८ नेत्यांनी राज्यातील शिवसेने-भाजप सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांसह ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली आहे. राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. फुटीनंतर अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवारांवर टीका केली होती.

त्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार, शरद पवार एका कार्यक्रमानिमीत्त एकाच व्यासपीठावर दिसुन आले. त्याआधी पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे एका कार्यक्रमात बोलताना 'शरद पवार साहेब आणि मी तेव्हाही वेगवेगळे नव्हतो आणि आजही नाही आहे, त्यामुळे काळजी करू नका', असं वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज शिरूर-हवेलीचे माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचार्णे यांच्या स्मारकाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी शिरुर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीवेळी शरद पवारांचे समर्थक म्हणुन पोपटराव गावडे तर बाबुराव पाचर्णे अजित पवारांचे समर्थक असल्याचा शिरुरमध्ये प्रचार झाल्याचे खुद्द अजित पवारांनी सांगत दाखला दिला. मात्र आम्ही त्यावेळीही वेगवेगळे नव्हतो आणि आजही नाही काळजी करु नका असे सांगत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

त्याचबरोबर अजित पवारांना सकाळी लवकरच कामाला सुरवात करतात, याबाबत विचारले असता त्यांनी आपल्याला शरद पवारांनी ही सवय लावली असल्याचे सांगितले आहे. अजित पवार म्हणाले, "सकाळी लवकर कामाला सुरवात करण्याची सवय शरद पवारांनी लावली. म्हणूनच सकाळी सात वाजताच कामाला सुरवात करीत असतो."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT