Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Birthday : "प्रिय बाबा,..."; वडिलांसाठी सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय तसंच सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळातूनही त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी याविषयी ट्वीट केलं आहे. या ट्वीटसोबत त्यांनी आपला फोटोही शेअर केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, "प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात. तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शरद पवार यांना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

‘ती’ पुन्हा येतेय! नजरेत तलवार, चाल अंगार, झी मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोतील ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

Pune Satara Highway: खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Pakistan Match Fixing : पाकिस्तानी फिक्सर, इंग्लंड दौऱ्यावर संशयास्पद घडामोडी! फोन जप्त, PCB कडून चौकशी; खूप मोठी नावं अडकणार?

SCROLL FOR NEXT