Sharad Pawar VS Prithviraj Chavan Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar VS Prithviraj Chavan: 'तुमची कॅटेगरी काय...?', शरद पवारांचा पृथ्वीराज चव्हाणांना खोचक सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे, या चव्हाणांच्या आरोपावर दिलं उत्तर

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघाडीतील नेते आता एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत. अशातच काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी, शरद पवार यांचा राजीनामा, पक्षातील नेत्यांचं कथित बंड या संपूर्ण घटनांवर टीकास्त्रसोडलं यावरून राज्यातील राजकारण तापल्याचं दिसून येत आहे.

अशातच काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखीलराष्ट्रवादीला लक्ष्य केलं होतं. त्यांनी कर्नाटकमध्ये बोलत असताना अजित पवार भाजपमद्धे जाणार असल्याच्या, राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे आणि राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी चालू असल्याचं म्हंटलं होतं. या संपूर्ण घटनांवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

'राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे', असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक निवडणुकीतील प्रचारादरम्यान केला होता. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षात काय स्थान आहे ते ए आहे की बी, सी आहे की डी आहे हे त्यांनी आधी चेक करावं. त्यांच्या पक्षापेक्षा सहकाऱ्यांना विचारावं की यांची कॅटेगरी कोणती आहेत ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे नाही सांगणार", असा खोचक टोला शरद पवारांनी चव्हाण यांना लगावला आहे.

तर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य रंगली आहेत. अशात महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कुरबुरी पाहायला मिळत आहेत. परंतु या टीकेचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही, वेगवेगळी मतं असतात. पण त्यामुळे आमच्यात गैरसमज नाहीत,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी लिहलेल्या अग्रलेखावर शरद पवारांची प्रतिक्रिया

"आपला पक्ष पुढे कसा जाणार हे आमच्या सहकाऱ्यांना माहित आहे. आम्ही काय करतो, त्यात आम्हाला समाधान आहे, ते लिहितील त्यांना लिहायचा अधिकार आहे. आमच्या दृष्टीने त्याला महत्त्व नाही," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'सामना'तील अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT