Sharad Pawar and Narendra modi esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ''मोदी चुकीचं बोलत आहेत, मी मुख्यमंत्री असताना...'' शरद पवारांचा पंतप्रधानांवर थेट हल्ला

Sharad Pawar : मोदी चुकीचं बोलत आहेत...

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला आरक्षणावरुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. महिला आरक्षणाबद्दल मोदी जे बोलत आहेत, ते चुकीचं असून यापूर्वी महिला आरक्षणासंदर्भात अनेकदा अनेक निर्णय झालेले आहेत, हे पवारांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका करणाताना महिला आरक्षणाला विरोधकांनी नाईलाजाने समर्थन दिल्याचं म्हटलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, संसदेत महिला आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला. दोन सदस्य सोडले तर कुणीही याला विरोध केला नाही. एक सूचना होती की, घटनात्मक दुरुस्ती करताना ओबीसींना देखील संधी द्यावी. ही पार्श्वभूमी असताना पंतप्रधान यांनी काँग्रेस आणि काही लोकांनी नाईलाजाने पाठिंबा दिल्याचं म्हणणं चुकीचं आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, 1993 साली महाराष्ट्राचे सूत्र माझ्याकडे होते. त्यावेळी राज्य महिला आयोग आम्ही स्थापन केला. आपलं राज्य हे पहिलं राज्य होतं. शिवाय स्वतंत्र महिला बालकल्याण विभाग सुरू केला आणि महिलांना आरक्षणाचा निर्णय घेतला.

''महिला आरक्षणावर यापूर्वीदेखील चर्चा झालेली आहे. महाराष्ट्राने देशात पहिलं महिला धोरण जाहीर केलं होते. सरकारी, निमसरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत ३३ टक्के आरक्षण महिलांना देण्यात आलं. असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं.''

''मी मुख्यमंत्री असताना हे निर्णय घेतले. तरीही पंतप्रधान म्हणतात, या देशात महिला आरक्षणासंदर्भात यापूर्वी विचारही केला गेला नाही. माझ्याकडे संरक्षण खातं होतं तेव्हा पहिल्यांदा ११ टक्के जागा महिलांना राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता.'' त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी चुकीचं बोलू नये, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT