Rajiv Satav system
महाराष्ट्र बातम्या

सोनिया गांधींच्या प्रश्नावर राजीव सातव म्हणाले, शरद पवार

या ठिकाणचे सातव यांचे भाचे प्रताप वाघ हे पुण्याला नोकरीनिमित्त स्थायिक आहेत. त्यांच्याकडे त्यांचे येणेजाणे असत.

गजानन गिरी

मसूर (जि. सातारा) : काँग्रेसचे खासदार राजीव सातव (rajeev satav) यांच्या निधनाची बातमी गावात धडकताच ग्रामस्थांकडून मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली. इथल्या ब्रह्मपुरी भागात सातव यांचे आजोळ आहे. लहानपणी त्यांचे येणे जाणे या ठिकाणी होत होते. मात्र अलीकडे त्यांच्या राजकीय (politics) क्षेत्रातल्या व्यापामुळे त्यांना या ठिकाणी यायला जमत नसले तरी आपल्या आजोळचा ॠणानुबंध जपला होता. या ठिकाणचे सातव यांचे भाचे प्रताप वाघ हे पुण्याला नोकरीनिमित्त स्थायिक आहेत. त्यांच्याकडे त्यांचे येणेजाणे असत. मात्र आजोळातली विचारपूसही ते आवर्जून करीत. सातव यांच्या निधनाचे वृत्त कळताच ब्रह्मपुरी भागात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (sharad pawar favourite leaders says rajiv satav sonia gandhi satara marathi news)

यावेळी किवळच्या माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी राजीव सातव यांच्या संदर्भातली एक आठवण सांगितली. त्या म्हणाल्या राजीवजी नेहमी महाराष्ट्रातील युवकांना प्राेत्साहन देत असतं. माझ्या वाचनातील आणि एेकण्यातील एक गाेष्ट तुम्हांला सांगते, ज्यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी (congress leader sonia gandhi) मुलाखत घेत होत्या. राजीव सातव त्यांच्या समोर बसले होते. मुलाखतीत राजीव सातव यांना सोनियाजींनी प्रश्न विचारला "तुमचा आवडता नेता कोण?" राजीवजींनी उत्तर दिले "शरद पवार".

मुलाखत झाली, राजीव सातवांना वाटले हे उत्तर दिल्यामुळे कदाचित आपली निवड होणार नाही. सोनिया गांधींनी राजीव सातव यांच्यातला प्रामाणिकपणा ओळखला होता. पुढच्या काही दिवसातच राजीवजी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तिथून सुरू झालेला झंझावात आज दुर्दैवाने संपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT