Sharad pawar got angry on Unnao rape case 
महाराष्ट्र बातम्या

'वेळीच कारवाई केली असती तर...' उन्नाव बलात्कार प्रकरणावर पवार भडकले

वृत्तसंस्था

मुंबई : उन्नाव बलात्कार प्रकरणीतील 23 वर्षीय तरुणीवर आरोपींनीच प्राणघातक हल्ला करत तिला जाळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. तिच्यावर चाकूने वार करत, पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्यात आले. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळीच कारवाई केली असती तर अशी चिंता व्यक्त केली आहे. 

या प्रकरणातील तरुणी पहाटे चार वाजता बैसवारा बिदार रेल्वे स्थानकात जात होती. तिकडून ती रायबेरीला जाणार होती. यावेळी या प्रकरणातील आरोपींनी तिच्यावर काठीने प्रहार केला. ती खाली कोसळल्यावर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. 
शरद पवार यांनी ट्विट करत या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. उन्नावमधील सामूहिक बलात्कारातील तरुणीला जिवंत जाळण्याची घटना ऐकून धक्का बसला. पीडिता सध्या मृत्युशी झुंज देत आहे. जर आरोपींना वेळीच अटक केली असती, तर ही घटना घडली नसती. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात तातडीनं कारवाई करावी,"'असे ट्विट पवारांनी केलं आहे.

ती 90 टक्के भाजली असून सध्या लखनऊमधील एसपीएम रुग्णालयात आहे. 
तिला आता दिल्लीतील सफरगंज रुग्णालयात हलविण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! गुन्हेगारांवर लागणार मकोका; प्रतिबंधित पदार्थांची पाळंमुळं नष्ट करण्याचा निर्धार

Share Market Fraud: शेअर बाजारात ५ टक्के नफ्याचे आमिष; पुण्यात ४६ गुंतवणूकदारांची १२ कोटींची फसवणूक उघड

Latest Marathi News Live Update : फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक ठप्प

Pune Online Fraud : पुण्यात ऑनलाइन गेमिंग फसवणूक रॅकेट उघडकीस; बनावट कॉल सेंटरवर छापे, मुख्य सूत्रधारासह १२ जणांवर गुन्हा

चिंध्यांचा फूटबॉल, अनवाणी पायाने खेळ; अमरावतीच्या खेळाडूने गाजवलेलं १९४८ चं लंडन ऑलिम्पिक

SCROLL FOR NEXT