sharad pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Seat Allocation : शरद पवार गटाच्या ९ उमेदवारांची संभाव्य यादी; बारामती, माढा, बीडमधून कोण?

Sharad Pawar Group List : काँग्रेसने गुरुवारी सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाची एक संभाव्य यादी पुढे येत आहे. या यादीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासह बीड, माढा, शिरुर, दिंडोरी, वर्धा या जागांचे उमेदवार ठरल्याचं सांगितलं जातंय.

संतोष कानडे

Sharad Pawar Group List : काँग्रेसने गुरुवारी सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाची एक संभाव्य यादी पुढे येत आहे. या यादीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासह बीड, माढा, शिरुर, दिंडोरी, वर्धा या जागांचे उमेदवार ठरल्याचं सांगितलं जातंय.

'साम टीव्ही'च्या वृत्तानुसार शरद पवार गटाची ९ जणांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. यामध्ये बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा या समदारसंघांचा समावेश आहे. हे मतदारसंघ शरद पवार गटाकडे जावू शकतात, असं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येत आहे.

जागा आणि संभाव्य उमेदवार?

  • बारामती- सुप्रिया सुळे

  • माढा- महादेव जानकर (रासप)

  • सातारा- बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील

  • शिरुर- अमोल कोल्हे

  • नगर दक्षिण- निलेश लंके

  • बीड- बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे

  • वर्धा- अमर काळे

काँग्रेसकडून सात उमेदवारांच्या नावांची घोषणा

१. नंदुरबार- गोवाल पाडवी

२. अमरावती- बळवंत वानखेडे

३. नांदेड- वसंतराव चव्हाण

४. पुणे- रवींद्र धंगेकर

५. लातूर- डॉ. शिवाजीराव कळगे

६. सोलापूर- प्रणिती शिंदे

७. कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती

दरम्यान, बीडच्या जागेवरुन राज्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर तेच लोकसभेचे उमेदवार असतील, असं सांगितलं जात आहे. तसं झालं तर पंकजा मुंडे यांना विजय अत्यंत सोपा होऊन जाईल. परंतु ज्योती मेटे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली तर मराठा मतं मेटेंना मिळवता येतील. पर्यायाने पंकजांना निवडणूक म्हणावी तेवढी सोपी ठरणार नाही.

पुण्याच्या जागेविषयी राज्यात उत्सुकता आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यातच नुकतेच मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे यावेळची पुणे लोकसभेची चुरस रंगतदार होणार, यात शंकाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT