Ajit Pawar VS Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP: शरद पवारांनी सेनापती गमावला? एका खासदाराचे आणि आमदाराचे अजित पवारांना समर्थन?

शरद पवार गटाच्या एका खासदाराचे आणि आमदाराचे अजित पवारांना समर्थन असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी पक्षामध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा पक्षात हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांनी बंड केलं त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि दोन गट निर्माण झाले. अशातच पुन्हा एकदा शरद पवार गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन अजित पवार गटाला असल्याची चर्चा सुरू आहे.

या खासदाराने आणि आमदाराने त्यांचे प्रतिज्ञापत्र अजित पवार यांच्याकडे दिल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष चर्चेत आला आहे. तर अजित पवार यांना समर्थन देणारा तो खासदार आणि आमदार कोण यावर अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.

अजित पवारांना समर्थन देणारा तो खासदार कोण आहे यांची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्यासोबत आता अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, फौजिया खान हे खासदार शरद पवारांसोबत आहेत, त्यांच्यापैकीही एक खासदार असू शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे.

तर अजित पवार यांच्या बंडानंतर पार पडलेल्या शपथविधीवेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यानंतर ते पुन्हा शरद पवार गटाकडे आले. तसेच राज्यसभेचे खासदार श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण आणि फौजिया खान हे सुरूवातीपासूनच शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आता कोणता खासदार अजित पवारांना समर्थन देणार याबाबतचे तर्क वितर्क लावले जात आहेत. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही' या वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून शरद पवार गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार गटाने पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत शरद पवार गटातील आमदारांना तात्काळ अपात्र करा अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीनंतरही अभिमन्यूची पुन्हा एन्ट्री! म्हैसूर दसरोत्सवात यंदाही खास सहभाग, ‘कॅप्टन हत्ती’ म्हणून जम्बो सवारीतही दिसणार

Karmala ZP School : जिद्दी शिक्षकांनी पाच लाखांच्या लोकवर्गणीतून केला शाळेचा कायापालट, जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधा; २५१ वृक्षांची लागवड

नॅशनल हायवेवर थांबलेल्या ट्रकला कार धडकून८ इंजिनिअर विद्यार्थ्यांचा मृत्यू; घटनेचा CCTV VIDEO VIRAL

Numerology: 'या' मूलांकाच्या लोकांना आधीच मिळतात भविष्याचे संकेत; येणाऱ्या संकटांचा आणि घटनांचा होतो पूर्वाभास!

Marathi News Live Updates: यंदा मुंबईत दहीहंडीचा उत्सव 'व्यसनमुक्त भारत, व्यसनमुक्त महाराष्ट्र' संकल्पनेवर आधारित - मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT