Sharad Pawar on Manoj jarange 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar on Manoj jarange: "मनोज जरांगेंनी सरकारला वेळ दिला पण..."; शरद पवार यांची स्पष्ट भूमिका

Sandip Kapde

Sharad Pawar on Manoj jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला पण त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. सरकारने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे समर्थन केले आहे. जरांगे सरकारला ३० दिवसांची मुदत दिली होती. ३० दिवसात काम होईल,असा विश्वास मनोज जरांगेंना दिला होता. त्यामुळे उपोषण करणाऱ्यांना आता दोष देता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

मराठा आरक्षण लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्याने मनोज जरंगे यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या मूळ गावी आंदोलन सुरू केले. सरकारने आम्हाला ३० दिवसांची मुदत मागितली पण मी ४० दिवस मागितले होते. आता सरकारला खूप वेळ दिला आहे, पण आता थांबणार नाही, असे जरांगे म्हणाले.

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांवरून सरकार काही व्यक्तींना आपल्या विरोधात भडकवत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आणि मराठा समाजाला आरक्षण न देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोणीतरी दबाव आणत असल्याचा दावा केला. उपोषणावर असलेले जरांगे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. सरकारने प्रतिसाद न दिल्यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही. (Latest Marathi News)

मुख्यमंत्र्यांनी ४० दिवस वाट पाहण्यास सांगितले होते-

उपोषण करण्यापूर्वी जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) यांनी मला ४० दिवस वाट पाहण्यास सांगितले होते जेणेकरून सरकार मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ शकेल, परंतु त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. माझ्या गावी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे जरांगेंनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT