Sharad Pawar and Ajit Pawar Group 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : मनधरणीसाठी आलेल्या आमदारांना पवारांचा एकच प्रश्न अन्...;

सकाळ डिजिटल टीम

मुंबई -राज्याच्या राजकारणात सातत्याने नवनवीन घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट झाले आहेत. मंत्रीमंडळात सामील होऊन मंत्रीपदे घेतल्यानंतर शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटाने वायबी सेंटर येथे शरद पवारांची घेतली.

अजित पवार यांच्या नेतृत्वात प्रफुल्ल पटेल आणि आमदार वायबी सेंटरवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आमदारांनी शरद पवार यांना पक्षात फुट पडू देऊ नये, अशी विनंती केली. तर शरद पवार यांनी उपस्थित आमदारांना आपआपल्या भागात पेरण्या झाल्या का, याबाबत विचारणा केली.

अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. काल रविवारी देखील अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांची वायबी सेंटर येथे भेट घेतली होती. आज देखील भेट घेण्यात आली. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आज देखील आम्ही शरद पवार यांना पक्षात फूट देऊ नये, अशी विनंती केल्याचं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांच्या लाईफलाईनमध्ये पुन्हा राडा! प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत...; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

आजचे पंचांग 17 जुलै 2026! राहुकाल, शुभ मुहूर्त, चंद्रबळ आणि दिनविशेष

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींनी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

Jalgaon Railway Flyover Update : जळगावला आणखी दोन रेल्वे उड्डाणपुलांची चाहूल? 'या' प्रकल्प मार्गावर होऊ शकतो पूल; रेल्वे विभागाकडून महापालिकेत प्राथमिक चाचपणी

बाबो! स्वप्नील जोशीने घेतली ६५ लाखांची टेस्ला; भावनिक पोस्टनं जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT