Ajit Pawar News esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : '...तरीही मी पक्षाचा अध्यक्ष होणार नाही', अजित पवारांच्या विधानाने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २ मे रोजी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. पवारांनी राजीनाम्याची भूमिका मागे घेतली नाही तर पुढचा अध्यक्ष कोण? याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेला कडाडून विरोध केला. पवार आता दोन दिवसांनी नवीन भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चार नावं चर्चेत आलेली आहेत.

या नावांमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. अजित पवार यांचंच नाव सर्वात आघाडीवर आहे. परंतु अजित पवार यांना आज याबाबत विचारलं असता त्यांनी सपशेल नकार दिला.

शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला नाही तर तुम्ही अध्यक्ष होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, माझा अध्यक्ष होण्याचा प्रश्नच येत नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं तरीही मी पक्षाचा अध्यक्ष होणार नाही. तसा विचार नाही, मी त्या पदावर काम करु शकत नाही; अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

शरद पवारच अध्यक्ष राहणार- सूत्र

उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहावेत, असा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मीडिया रिपोर्टनुसार २०२४ पर्यंत शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जाबाबदारी सांभाळावी आणि एक कार्याध्यक्ष नेमावा असा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात कार्याध्यक्षलाही तयारी करायला वेळ मिळेल.

हा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती असून शरद पवार हा प्रस्ताव स्वीकारतील, असंही बोललं जात आहे. त्यामुळे २ मे रोजी शरद पवारांनी घेतलेला निर्णय ते मागे घेणार का, हे दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अंतरवालीत घडलं मोठं नाट्य; सरकार-जरांगे चर्चेचा निकाल काय? जाणून घ्या आतली माहिती

'या' अभिनेत्रीच्या तोंडाचा येत होता वास, बॉबी देओलने किसिंग सीन देण्यास दिला स्पष्ट नकार, नक्की काय घडलेलं?

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT