Sharad Pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा ॲक्शन प्लॅन तयार; पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार की नाही याचा फैसला आज होणार आहे.

धनश्री ओतारी

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार की नाही याचा फैसला आज होणार आहे. त्यासाठी आज पक्षाच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. अशातच मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा ॲक्शन प्लॅन तयार आहे. यामध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. (Sharad Pawar Resigns committee two proposals plan A plan B Supriya Sule)

शरद पवार यांनीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर राहावं, अशी मागणी मागील दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. दरम्यान आज होणाऱ्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य समिती आज दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडणार आहे.

प्लॅन ए आणि प्लॅन बी असे दोन महत्त्वाचे प्रस्ताव समितीकडून मांडले जातील. पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा निर्णय समस्य समिती देणार आहे.

पहिल्या प्रस्तावाला शरद पवार कायम नसतील तर मात्र समिती दुसरा प्रस्ताव मांडणार आहे. दुसऱ्या प्रस्तावात एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना समर्थन द्यावं, असं सुचवण्यात येणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट करण्यासाठी शरद पवार हेच नाव अग्रणी असल्यामुळे त्यांनी राजीनाम्याचा विचार मागे घ्यावा असं विरोधी पक्षांचे मत आहे. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT