Sharad Pawar Resigns 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादी कार्यध्यक्षापदाबाबत जयंत पाटील यांनी दिली मोठी अपडेट

शरद पवार यांच्या राजीनाम्यासह कार्याध्यक्षपदाचीही चर्चा

धनश्री ओतारी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजीनाम्यासह कार्याध्यक्षपदाचीही चर्चा राजकीय गोटात जोरदार सुरु आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठी अपडेट दिली.(Sharad Pawar Resigns Jayant Patil big update on NCP working president post)

आज राष्ट्रवादीच्या सदस्या समितीची बैठक पार पडली. यावेळी शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या सदस्य समितीनं फेटाळला. आता सर्वांचं लक्ष शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लागलं आहे. अशातच कार्याध्यक्षपदाचीदेखील चर्चा पाहायला मिळत आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षापदाचा प्रस्तावासंदर्भात विचारले. असता त्यांनी नाही नाही असा दोनदा उल्लेख करत शरद पवार यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे म्हटले आहे.

शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष पदावरुन निवृत्त होऊ नये. त्यांनी त्यांच्या जोडीला किंवा त्यांचं काम पाहण्यासाठी कार्याध्यक्ष नेमावा, असं मत राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी व्यक्त केलं होतं.

तसेच, शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम राहून पक्षात कार्याध्यक्ष पद निर्माण करावं व या पदावर त्यांच्या संमतीनं एखाद्या नेत्याची नेमणूक करावी, असा प्रस्तावही नेत्यांनी दिला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात कार्याध्यक्षपदाची चर्चा सुरु झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Politics : गोकुळमध्ये पडद्यामागे राजकीय घडामोडी; अध्यक्ष निवडीआधी संचालकांना घरातून उचललं; सतेज पाटलांचे १३ संचालक सहलीवर, महायुतीचे संचालक गोव्याला जाणार?

Jobs For Agniveer: अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी! परीक्षेविना थेट नोकरी, २५० हून अधिक जणांना नियुक्तीपत्रे

IND vs NZ 2nd T20I: भारत-न्यूझीलंड दुसरा सामना किती वाजता सुरू होणार? वैभव सूर्यवंशी Playing XI मध्ये दिसणार... Live कुठे दिसणार?

Numerology: 'या' मूलांकाच्या लोकांना प्रिय असते प्रायव्हसी,स्वत:ची स्पेस! पार्टनरसोबत असूनही एकटे राहणे का आवडते?

Latest Marathi News Live Update : दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?

SCROLL FOR NEXT