Sharad Pawar Resigns 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे मविआची वज्रमुठ सैल; तिन्ही सभा रद्द

पवारांच्या निर्णयाचा परिणाम मविआच्या वज्रमूठ सभेवर

धनश्री ओतारी

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या या निर्णयाचा परिणाम आता मविआच्या वज्रमूठ सभेवर होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर नाशीक आणि पुणे येथे होणारी वज्रमूठ सभा रद्द करण्यात आली आहे. (Sharad Pawar Resigns MVA Kolhapur Nashik and Pune Vajramuth Sabha cancelled )

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर अनेक नेत्यांनी राजीनामादेखील दिला आहे. अशातच राज्यातील होणाऱ्या तीनही सभा रद्द होणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापूर नाशीक आणि पुणे येथे होणारी वज्रमूठ सभा रद्द होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यासंदर्भात जयंत पाटील यांनी माहिती दिली. उन्हामुळे सभेच्या तारखा बदलण्यात आल्या आहे. सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात ही चर्चा १ तारखेलाच झाली होती. असे पाटील म्हणाले.

मात्र, आत्तापर्यंत झालेल्या या सभा सायंकाळी पार पडल्या आहेत. मग पाटील यांनी सभा रद्द होण्याचे कारण कितपत खरं? असा सवाल उपस्थित होत आहे.

महाविकास आघाडी उभी करण्याचे श्रेय सर्वच नेते शरद पवार यांना देतात. मात्र पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पवार यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे काय होणार, हा मोठा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीतर्फे घेण्यात येणाऱ्या वज्रमूठ सभांपैकी प्रत्येक पक्षाने दोन सभांची जबाबदारी घेतली होती. औरंगाबाद व मुंबईतील सभेच्या आयोजनाची जबाबदारी शिवसेनेची होती; तर नागपूर व कोल्हापूर येथील सभांची जबाबदारी काँग्रेसने घेतली होती.

पुणे व नाशिक येथील सभा राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित करणार होती. येत्या दोन आठवड्यांमध्ये पुणे येथे वज्रमूठ सभा होणार आहे. मात्र नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता ही सभा बारगळण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अंतरवालीत घडलं मोठं नाट्य; सरकार-जरांगे चर्चेचा निकाल काय? जाणून घ्या आतली माहिती

'या' अभिनेत्रीच्या तोंडाचा येत होता वास, बॉबी देओलने किसिंग सीन देण्यास दिला स्पष्ट नकार, नक्की काय घडलेलं?

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT