Sharad Pawar Resigns esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: लोकसभे’पर्यंत थांबा देशभरातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांची पवारांना साद

रुपेश नामदास

मुंबई: भाजपविरोधात समविचारी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर देशभरातील स्वपक्षीय नेत्यांसह इतर समविचारी पक्षांची कोंडी झाली आहे. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी भूमिका देशभरातील भाजपविरोधी पक्षांची असून, जर त्यांना निर्णयावर ठाम रहायचे असेल, तर किमान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी निर्णय मागे घ्यावा अशी, या नेत्यांची भूमिका असल्याचे समजते.

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर इतर राज्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी, एम. के. स्टॅलिन यांनीही पवारांशी संपर्क साधत विचारणा केल्याचे सांगण्यात येते. पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अशीच भावना भाजपविरोधात देशपातळीवर काँग्रेससह जे जे पक्ष एकत्र येत आहेत त्या सर्व पक्षांच्या नेत्यांची आहे.

राष्ट्रवादीच्या समर्थकांनी गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकला आहे. दिवसभर घोषणाबाजी अन् भावनिक होत हे कार्यकर्ते शरद पवार यांना साद घालत होते.

आज स्वतः शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ‘‘आपण सर्वानी हे थांबवावे. उपाशी राहू नये. तुमच्या मनात जे आहे तसा चांगला निर्णय होईल,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पवार यांनी निवृत्तीच्या माघारीबाबत आजही थेटपणे सूतोवाच केले नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आजही प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गज नेते ठाण मांडून होते.

उद्याच्या बैठकीत पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेबाबत नेत्यांमध्ये चर्चा होऊन पवार यांनीच पक्षाध्यक्षपदी राहावे असा एका ओळीचा ठराव संमत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : नाशिक शहरातील आठवड्यातून एक दिवसाची पाणी कपात रद्द

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT