Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहणार; उद्याच्या बैठकीत येणार प्रस्ताव, सूत्रांची माहिती

संतोष कानडे

मुंबईः २ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या घोषणेला कडाडून विरोध केला.

त्यानंतर शरद पवार यांनी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला होता. मगच आपण आपली भूमिका जाहीर करु, असं ते म्हणाले. आज पुन्हा शरद पवार यांनी दोन दिवसांची वेळ घेतली.

उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहावेत, असा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मीडिया रिपोर्टनुसार २०२४ पर्यंत शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जाबाबदारी सांभाळावी आणि एक कार्याध्यक्ष नेमावा असा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात कार्याध्यक्षलाही तयारी करायला वेळ मिळेल.

हा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती असून शरद पवार हा प्रस्ताव स्वीकारतील, असंही बोललं जात आहे. त्यामुळे २ मे रोजी शरद पवारांनी घेतलेला निर्णय ते उद्या मागे घेणार का, हे स्पष्ट होईल.

शरद पवार यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. पवारांनी पदावरुन बाजूला जावू नये, सध्या राज्यात आणि देशात वेगळी परिस्थिती आहे, विरोधकांना एकजुटीने लढावे लागेल, अशा भावना व्यक्त होत आहेत. त्यामुळे पवार माघार घेतील, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT