Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार यांचे दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांना पत्र

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपुर्ण दुष्काळी भागासाठी सर्वकष निर्णय घ्यावेत अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

दरम्यान राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्याची वेळही शरद पवार यांनी पत्राद्वारे मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेचा रणसंग्राम संपताच सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर या दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर थेट जात आणि चारा छावण्यातील शेतकऱ्यांच्या, मालकांच्या अडचणीही जाणून घेतल्या.

शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या जाणून घेतलेल्या समस्या, त्यांच्या अडचणी यावर उपाययोजना काय करायला हव्यात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात प्रत्येक मुद्दे आणि समस्या व दुष्काळावर काय उपाययोजना कराव्यात याबाबतचे सविस्तर म्हणणे मांडले आहेत.

या समस्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी दुष्काळी भागातील काही प्रतिनिधींसह मुख्यमंत्र्याची वेळही मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या २४ तासांत ‘अनफिट’; IND vs AFG वनडे मालिकेपूर्वी बंगळुरूत नेमकं काय घडलं? Inside Story

Pune Bengaluru Highway : पुणे-बंगळूर हायवेने प्रवास करताना सावधान! प्रत्येक 5 किलोमीटरवर बसवले स्मार्ट कॅमेरे; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

Latest Marathi News Live Update : हरियानातील हांसी येथे जिम मालकाची गोळ्या झाडून हत्या

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! DA मध्ये होणार दोनदा वाढ, जाणून घ्या अपडेट

Ladki Bahin Yojana May Installment : लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख ठरली; शासन निर्णय जारी

SCROLL FOR NEXT