sharad pawar ajit pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचा वजीर ४० आमदारांसह गायब होणार होता, पण…', शिवसेनेच्या आमदाराचं वक्तव्य

शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत, असंही त्यांनी म्हटलंय

अंकिता खाणे (Ankita Khane)

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली. त्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली. शरद पवार यांच्या घोषणेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटताना दिसुन येत आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. (शिंदे गट) शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजीर ४० आमदारांसह गायब होणार होता. त्यामुळे शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत, असं महेश शिंदे यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महेश शिंदे म्हणाले कि, “शरद पवार हुशार आहेत. त्यांना कळलं होतं की, वजीर निघून चालला आहे. त्यामुळे आख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर होता. थोड्या दिवसांनी हे होणारच आहे. त्यामुळे हा प्रश्न नाही. पण, शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत,” असं त्यांनी म्हंटलं आहे.

तर पुढे बोलताना ते म्हणाले कि, “महाराष्ट्रात प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. एका घरात दोन मुख्यमंत्री कसं होणार हा मोठा प्रश्न आहे. ज्याची क्षमता आहे, त्याने मुख्यमंत्री होण्यास हरकत नाही.” तर शरद पवारांच्या निर्णयाचा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणावर काय परिणाम होईल का यावर महेश शिंदे म्हणाले, “ज्या जमिनीवर उभा होतो, ती जमीनच विकली गेलेली आहे, हे आता त्यांना कळलं आहे. जमिनीचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT