Shivsena Cm Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : 'शिवसेना भवन दादर' नव्हे 'आनंद आश्रम ठाणे'; मुख्यालयाचा नवा पत्ता!

शिवसेना हे नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला अधिकृतपणे शिवसेना म्हटलं जात आहे. शिंदे गटाकडून तसं पत्रकही काढण्यात आलं आहे. आता पक्ष मुख्यालयाचा पत्ताही बदलला आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेना सचिव संजय मोरे यांनी काढलेल्या पत्रकावर ठाण्यातल्या आनंद आश्रमाचा पत्ता आहे. त्यामुळे आता शिवसेना मुख्यालयाचा पत्ता शिवसेना भवन दादर नव्हे तर आनंद आश्रम ठाणे असा असणार आहे. शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय आता ठाण्यातलं आनंद आश्रम इथं असेल असं या पत्रकावरुन स्पष्ट होत आहे.

ठाकरे आणि शिंदे यांच्यातला शिवसेना पक्षावरुन चाललेला संघर्ष निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं आहे. यापूर्वी आयोगाने शिंदे गटाला ढाल आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं होतं, तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT