shivsena Deepali Sayed on raj thackeray letter letter to devendra fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

दुसर्‍यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार; दिपाली सय्यदांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात मविआ सरकार पडल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे. यांनंतर दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार म्हणत शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केलीय.

फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार, बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यासह अनेक नेत्यांनी त्यांनी मुख्यमंत्री राहिल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून काम कराव लागतं असल्याच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे. शरद पवार यांनी तर त्यांच्या चेहर्‍यावरून ते नाराज असल्याचं दिसत असल्याचं म्हटलं होतं, त्यांनंतर राज ठाकरे यांनी यांनी वेगळी भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या फडणवीस यांचं कौतुक केले आहे

दिपाली सय्यद यांनी ट्विट करत मनसे अध्यक्षांना सवाल केला आहे की, "दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार माननीय राजसाहेब कधीतरी १ आमदारा वरून तुमचा धनुष्यबाण २ आमदारावर पोहचवुन जनतेला दाखवुन द्या कि कर्तृत्व नक्की काय असते, नाहीतर सारखी दोरी मागे ओढावी लागते हे बरे नव्हे!" असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

राज ठाकरे काय म्हणालेत?

राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ही बढती आहे की अवनती यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे, एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मन:पूर्वक अभिनंदन!, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation: दिल्लीत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; महिला आरक्षण आणि फेररचना विधेयके अधिवेशनात मंजूर होणार, अमित शहांच्या भेटीनंतर मोठे विधान

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Satara News: वर्षासरींत आली आनंदवारी! ज्ञानेश्‍वर माउलींचे सातारा जिल्ह्यात आगमन; हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण

SCROLL FOR NEXT