shivsena election commission allot shivsena uddhav balasaheb thackeray name flaming torch symbol  
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: कसं दिसतं उध्दव ठाकरे गटाचं नवं पक्षचिन्ह? फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: शिवसेनेचे निवडणू चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याता आल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून तीन नवीन पर्याय मागवण्यात आले होते, त्यापैकी केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव वापरण्यास परवानगी दिली असून निवडणूक चिन्ह म्हणून मशाल वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालेलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून नवीन चिन्हाचा फोटो जाहीर करण्यात आला आहे, शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लगेचच या नवीन चिन्हाचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. शिवसेनेचे आमदार विनायक राऊत यांनी शिवेसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे कॅप्शन देत पक्षचिन्हाचा फोटो ट्विट केला आहे.

उध्दव ठाकरे गटाचे चिन्ह वर धगधगती मशाल आणि खाली मोठ्या अक्षरात शिवसेना आणि त्याखाली उध्दव बाळासाहेब ठाकरे असं लिहिलेलं आहे. उद्धव ठाकरे गटाच्या पक्षचिन्हाचा हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

ठाकरे पहिल्या प्रयत्नात जिंकले...

ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव मिळाले आहे. तर मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते भास्कर जाधव म्हणाले की "पहिल्याच प्रयत्नात उद्धव ठाकरे जिंकले आहेत. कारण 'उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना' या नावाची आम्ही मागणी केले होती तेच नाव आम्हाला मिळाले आहे.

तर आम्ही ज्या चिन्हांची मागणी केली होती त्यापैकीच चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पहिल्याच प्रयत्नात जिंकले आहेत. या निर्णयावर आम्ही आनंदी आहोत, समाधानी आहोत, तर बाळासाहेब ठाकरे हे नाव चोरण्याचे काही लोकांनी प्रयत्न केला परंतु ते झाले नाही. आशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT