Nitin Chandrakant Desai  esakal
महाराष्ट्र बातम्या

Vinayak Raut: 'नरेंद्र मोदींच्या माणसांना कंटाळून नितीन देसाईंनी आत्महत्या केली', विनायक राऊतांचा आरोप

Shivsena ND Studio:एनडी स्टुडीओ कुणाच्याही घशात जाऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दिला.

सकाळ डिजिटल टीम

Vinayak Raut on Nitin Desai:काही दिवसांपूर्वी प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाईंनी एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या स्टुडीओमधून काही साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस पोलिसांनी जप्त केलं होतं. त्यातून त्यांना नितीन देसाईंच्या काही रेकॉर्डिंग्स सापडल्यात ज्यात त्यांनी आपला मानसिक छळ केला जात असल्याचं सांगितलं. त्यांचा स्टुडीओ कंपनीच्या ताब्यात देऊ नये, असे आवाहन त्यांनी आपल्या रेकॉर्डिंगमधून केले होते.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी आपल्या एका भाषणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मोदींच्या माणसांना कंटाळून नितीन देसाईंनी आत्महत्या केली,असा आरोप विनायक राऊतांनी केला. स्टुडीओचे रक्षण शिवसैनिक करतील, तो कुणाच्याही घशात जाऊ देणार नाही, असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला.

विनायक राऊत एका भाषणात म्हणाले की, "एका गुजराती दलालाच्या त्रासाला कंटाळून, नरेंद्र मोदींच्या माणसाला कंटाळून नितीन देसाईंनी आत्महत्या केली. पण कोणत्याही परिस्थितीत आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे, शिवसेना देसाईंचा स्टुडीयो कुण्याच्याही घश्यात जाऊ देणार नाही. त्याच रक्षण आम्ही करणार म्हणजे करणार."(Latest Marathi News)

नितीन देसाई यांनी आपल्या स्टुडीओसाठी एडलवाईज कंपनीच्या ईसीएल फायनान्स या कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तगादा लावला होता. ज्यामुळे नितीन देसाईंना आर्थिक त्रासातून जावं लागलं. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर एडलवाईज कंपनीच्या पदाधिकांऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT