MLA Disqualification Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena MLA Disqaulification: आमदार अपात्रतेचा निर्णय लांबणीवर! सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली सुनावणीची तारीख

आमदार अपात्रतेच्या निर्णयावरील सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता ६ ऑक्टोबरला घेतली जाणार आहे.

Manoj Bhalerao

MLA Disqualification: शिवेसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सूचना केल्या होत्या. योग्य वेळेत सुनावणी न झाल्याने सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सुनावलं देखील होतं. त्यानंतर आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग आला.

यावेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावणीचा रोडमॅप सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला होता. ही सुप्रीम कोर्टाची ही ३ ऑक्टोबरला घेतली जाणार होती. मात्र, आता ही सुनावणी ३ ऑक्टोबरऐवजी ६ ऑक्टोबरला घेतली जाणार आहे.

शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रेबाबत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती . यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टान यावर निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. याबद्दल ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर निर्णय घेताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुनावलं होतं. त्यानंतर त्यांना निर्णय घेण्यासाठी दोन आठवड्यांना वेळ देण्यात आला होता. त्याबरोबच सुनावणीचा कशाप्रकारे घेतली जाणार याचा रोडमॅप देखील विधानसभा अध्यक्षांकडे मागण्यात आला होता. हा रोडमॅप सादर करण्यासाठी ३ ऑक्टोबरला सुनावणी घेण्यात येणार होती. आता ही सुनावणी ३ ऐवजी ६ ऑक्टोबरला घेण्यात येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

PM मोदींचा VIDEO अन् नड्डांची भेट, वांगचुक यांचं उपोषण मागे; पण CJPचे आंदोलन सुरूच, प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख! पंढरपूर तालुक्यातील ‘या’ ७ शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कर्जमुक्तीचे सातबारा, पंढरपूर बाजार समितीत कृषी महोत्सव

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT