MLA Sanjay Shirsat Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Shirsat : "सत्तेतील आमदाराला जास्त निधी मिळतोच, हा अलिखित नियम!" शिवसेना आमदाराचं वादग्रस्त विधान

अंबादास दानवे आणि मंत्री भुमरे यांच्यात निधी वाटपावरून भर बैठकीत बाचाबाची झाल्यानंतर संजय शिरसाठ यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दत्ता लवांडे

Chh. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निधी वाटपाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर सत्तेत असलेल्या प्रत्येक आमदाराला जास्त निधी मिळतो असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे.

दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये कन्नड मतदारसंघातील एका विकास कामाच्या निधीचा मुद्दा उपस्थित झाला आणि दानवे यांनी निधी वाटपामध्ये विरोधातल्या आमदारांवर अन्याय केला जातो असा आरोप केला. त्यानंतर पालकमंत्री भुमरे आणि पणन मंत्री सत्तार यांनी दानवे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आणि वाद पेटला.

एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत यांची मजल गेली होती त्यामुळे या बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला. या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा वाद झाल्यानंतर "प्रत्येकाला वाटतं आम्हाला निधी जास्त मिळाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो त्याला निधी जास्त मिळतो हा अलिखित नियम आहे. पुर्वी तुम्हाला जो निधी मिळत होता त्यामध्ये कमतरता झाली नाही मग आता तुम्हाला वाढीव निधी कशाला पाहिजे?" असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

"पालकमंत्री सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. कन्नडच्या आमदाराने आरोप केला की, माझ्या मतदारसंघात एकही पैसा आला नाही. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितलं की, कलेक्टर यांच्याकडून तुम्हाला लेखी उत्तर मिळेल, तरीही त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला" असं मत सिरसाट यांनी माध्यमांना बोलताना व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT