sanjay raut esakal
महाराष्ट्र बातम्या

'हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय, महंत गिरींच्या मृत्यूची CBI चौकशी करा'

सकाळ डिजिटल टीम

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूबद्दल खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूबद्दल खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. अयोध्येत उद्धव ठाकरे जाणार होते तेव्हा आम्ही त्यांच्या आशीर्वादासाठी जाणार होतो. त्यांची आत्महत्या जरी म्हणत असाल तरी त्यांच्या भक्तांना ती हत्या वाटते. त्यात षडयंत्र काय आहे याचा तपास होणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात जमावाच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाला. तेव्हा देशभरातून आवाज उठला. नरेंद्र गिरींच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं तेव्हा उत्तर प्रदेशात हिंदूत्वाचा गळा घोटला. त्यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. ते आत्महत्या करतील असं वाटत नाही. याची कारणं शोधण्याची गरज आहे. आणि ती कोणी शोधायची हे ठरवायला हवं. अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. कोणतीही हिंदुत्वाचा गळा घोटतंय असं मला क्षणभर वाटलं असं राऊतांनी म्हटलं.

राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील व्यवस्था ही तीन पक्षांची आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहे. राज्याचं सरकार पाच वर्षे चालेल आणि याला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे.

उद्धव ठाकरेंचे सरकार हे अलिबाबा आणि चाळीस चोर असं सोमय्या म्हणाले. तर ते काहीही उपमा देऊदेत आम्ही त्यांना ओळखत नाही. कोणाकडे काही माहिती असेल तर घ्यावी आणि राज्यातील पोलिसांना द्यावी. राज्यातील सरकार हे कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे सरकार आहे. आम्हाला नियम कायदे आणि कामाच्या पद्धती माहिती आहेत असे राऊतांनी सांगितले.

कोणी चिखल उडवायचं ठरवलं असेल तर त्यांचा प्रश्न आहे. अशा गोष्टींमध्ये दुर्लक्ष केलेलं बरं. आरोप प्रत्यारोप होत असतात आणि तुम्ही कोणत्या पातळीवर जाऊन तुम्ही या गोष्टी करतात हे पाहायला हवं असं राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तोच अपरकट, तेच पुढे येऊन षटकार खेचणे... वीरेंद्र सेहगावच्या लेकाची 'सेम टू सेम' बॅटिंग; आर्यवीरच्या १७३ धावांचा Video Viral

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Latest Marathi News Live Update : बुलडाण्यात सर्क्युलर रोडवर धावत्या बसला आग! युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

SCROLL FOR NEXT