Jitendra Awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: "राम बहुजनांचे ते मांसाहारी होते"; जितेंद्र आव्हाडांचा वादग्रस्त दावा

शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजन करण्यात आले होते, यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते.

Sandip Kapde

Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता तो 14 वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात?, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजन करण्यात आले होते, यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुम्ही इतिहास वाचत नाही, मनात ठेवत नाही. राजकारणात आपण वाहत जातो. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम आमचा आहे. तुम्ही जिथे आम्हाला शाकाहारी बनवायला जात आहात. तिथे आम्ही आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आज आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श आहे राम शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता. १४ वर्ष जंगलात राहणारा माणूस शाकाहारी शोधायला कुठं जाणार?

अजित पवार यांच्यावर हल्लाबोल -

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर देखील टीका केली. २०१९ मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर बसवणं ही मोठी चूक होती. जिथे जिथे संधी मिळाली तिथे साहेबांचा माणसांचा अपमान केला. दत्ता मेघे यांच्या उदाहरण आहे. शरद पवार तुम्ही यांचे परतीचे दरवाजे बंद करा, आव्हाड यांनी सांगितले.


शरद पवार तुम्ही यांचे परतीचे दरवाजे बंद करा. ते तुमच्यावर बोलतील.तर एक मिनिटात त्यांच्यावर प्रत्युत्तर दिलं जाईल. ते तुमच्या वयाबद्दल बोलतात. दिलीप वळसे पाटील यांच्या वयात काय? ते VT ते आंबेगाव marathon धावणार आहेत का?, असे आव्हाड म्हणाले.

मला आश्चर्य वाटतं तटकरे यांचं...मैत्रीसाठी मला सोडून मुलीला पालकमंत्री केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं की तुला रायगड द्यायच होते. पण ते अजित पवार यांच्यामुळे शक्य झालं नाही. मैत्रीला जागले दादा. २०१९ चा बंडात सर्वात मोठा हात सुनील तटकरे यांचा होता. तुम्ही हे घर फोडले. तुमच्या घराची काय स्थिती आहे? तुमच्या सख्ख्या बहीण भावात काय होतंय? तुम्ही जे पेराल तेच उगवेल, अशी टीका देखील जितेंद्र आव्हाड यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT