Shrikant Deshmukh Sakal
महाराष्ट्र बातम्या

BJP Leader MMS: "...नांदायला नेले नाही तर आत्महत्या करणार आणि त्याला चंद्रकांत पाटील जबाबदार"

काही महिन्यांपूर्वीच या भाजपा नेत्यासोबत एका लॉजवर विचित्र अवस्थेत असतानाचा क्षण तिने फेसबुक लाईव्ह वर देखील दाखवला होता.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर जिल्ह्यातले भाजपा नेते श्रीकांत देशमुख यांचा काही दिवसांपूर्वी एका तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या तरुणीने देशमुख यांच्यासोबत आपलं लग्न झाल्याचा दावा केला होता. या तरुणीने आता आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. तसंच आपल्या आत्महत्येला चंद्रकांत पाटील जबाबदार असल्याचंही म्हटलं आहे.

श्रीकांत देशमुख यांच्यासोबत लग्न झाल्याचे दावा करणारी तरुणी निर्मला यादव हिने एक फेसबुक पोस्ट करून आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. या आत्महत्येला भाजप नेते रणजित निंबाळकर, चंद्रकांत पाटील, श्रीकांत देशमुख आणि श्रीकांत देशमुख याची पत्नी जबाबदार असेल असेही तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

निर्मला यादव आणि भाजप नेते श्रीकांत देशमुख यांच्यात मागील वर्षभरापासून वाद सुरू आला आहे. श्रीकांत देशमुख यांनी आपली फसवणूक केल्याचा दावा या तरुणीने केला होता. काही महिन्यांपूर्वीच तिने एका लॉजवर देशमुख यांच्यासोबत असताना फेसबुक लाईव्हही केलं होतं. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

निर्मला यादवची फेसबुक पोस्ट खालीलप्रमाणे -

"आमची कुलस्वामिनी तुळजापूर भवानी मातेच्या साक्षीने आमचे लग्न पुण्यामध्ये दोन पंडितांच्या साक्षीने झाले आहे आणि त्या पंडितांनी सोलापूर पोलिसांना जबाब लिहून दिला आहे की श्रीकांतचे आणि माझे लग्न स्वत: त्या पंडितांनी लावून दिले आहे. मी सुहासिनी सारखीच मरणार. माझ्या सुहासिनी लेण्याच्या समोर कोणतीच ताकद मी मानत नाही , या येत्या २७ फेब्रुवारी ला आमच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होत आहे, जर माझ्या नवऱ्याने स्वत: येऊन या २७ फेब्रुवारीपर्यंत जर मला घरी नांदायला घेऊन नाही गेले तर मी स्वतः माझे आयुष्य संपवणार आहे , मी एक सुहासिन आहे. माझ्या वरती खोटा हनीट्रॅप माझी खोटी बदनामी , यासर्व गोष्टी ला मदत करणारे रणजीत निंबाळकर आणि चंद्रकांत दादा पाटील आणि श्रीकांत देशमुख यांचा मोठा भाऊ शशfकांत देशमुख आणि श्रीकांत ची पहिली बायको माझ्या मरणाला जिम्मेदार असतील".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT