ST News  esakal
महाराष्ट्र बातम्या

ST News: एसटी होणार अपघात शून्य; महामंडळाने हाती घेतली महत्वाची मोहीम

सकाळ डिजिटल टीम

ST News: सुरक्षितता अभियानाच्या माध्यमातून चालक व इतर कर्मचाऱ्यांच्यामध्ये जनजागृती करून वर्षभर " अपघात शून्य एसटीचे ध्येय " साध्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील,असा विश्वास एसटी महामंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला.एसटीने सुरू केलेल्या सुरक्षितता अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलतांना कुसेकर म्हणाले की गेली ७५ वर्षे पेक्षा जास्त काळ महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला हक्काचे प्रवासी दळणवळणाचे साधन म्हणून एसटी सुरक्षित सेवा देत आहे. म्हणूनच " सुरक्षित प्रवास.. म्हणजे एसटीचा प्रवास...!" असा विश्वास सर्वसामान्य प्रवाशांच्या मनात तयार करण्यात एसटी यशस्वी झाली आहे. हा विश्वास आणखीन वृद्धिंगत करण्याचा महामंडळाचा प्रयत्न राहणार आहे.

अपघात विरहित सेवा देण्यामध्ये चालक हा महत्त्वपूर्ण घटक आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती कर्तव्यावर असताना चांगली राहील, असे वातावरण निर्माण करणे हे एसटीचे अधिकारी व पर्यवेक्षक यांचे महत्त्वाचे काम आहे. असे कुसेकर म्हणाले. त्यासाठी कर्मचाऱ्याचे विश्रांतीगृहे, तेथील प्रसाधनगृहे अत्यंत स्वच्छ असली पाहिजेत. त्यांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी पुरेशी झोप मिळाली पाहिजे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या वेळोवेळी झाल्या पाहिजेत. चालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

डुलकी लागणे व वेगाने वाहन चालवणे ही अपघातामागची प्रमुख कारणे आहे. एसटी चालकांनी याबाबत जागृत राहिले पाहिजे.त्यासाठी कर्तव्यावर जाण्यापूर्वी आपला आहार आणि पुरेशी झोप याबाबत दक्षता घेतली पाहिजे.

अरविंद साळवे,पोलीस अधीक्षक, वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT