Transfers of police  sakal
महाराष्ट्र बातम्या

State Police : राज्य पोलीस दलात 639 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; मुंबईतील 113 अधिकारी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्य पोलीस दलात फेरबदल करण्याचे सत्र सुरू आहे. जून महिन्यात सुरू करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती आणि बदलीनंतर गृह विभागाने शुक्रवारी राज्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

या आदेशानुसार राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या 639 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या 639 सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये मुंबईतील 113 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.बदली आदेशाची प्रत संबंधीत पोलीस अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश गृह विभागाने दिले आहे.

न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे आदेशाचा भंग होणार नाही याची पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे. बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी गैरहजर राहतील त्यांना स्थित कार्यमुक्त करण्यात यावे, व त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा असे आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT