sudhir mungantiwar, Nitesh rane and Vijay Wadeattiwar 
महाराष्ट्र बातम्या

वक्तव्य गांभीर्याने केले पाहिजे; वडेट्टीवार-नितेश राणे वादावर मुनगंटीवार यांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यातील जोरदार खडाजंगी सुरू आहे. नितेश राणे यांनी वडेट्टीवार हे आगामी काळात मंत्री असतील, असा दावा केला होता. त्याला वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावर आता सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया आली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, त्यांच्यातील टीकेचा अर्थ नितेश राणे आणि वडेट्टीवार यांनाच विचारला पाहिजे. राजकीय क्षेत्रात वक्तव्य करताना गंभीरतेने करावे, सध्याच्या काळात वक्तव्य गंभीरपणे केलं जातं नाही. वडेट्टीवार कधी कधी म्हणतात सरकार जाणार, त्यांच्या या वक्तव्यावर नितेश राणे यांचं उत्तर असू शकतं, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं.

पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर मुनगंटीवार म्हणाले की, मी पूर्ण व्हिडीओ बघितला आहे. त्यांनी देवाला जशी प्रार्थना करतात तशी प्रार्थना केली आहे.

दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांला झालेल्या मारहाणीवर मुनगंटीवार म्हणाले की, त्याच्या मित्राने मलाही फोन केला, मारहाण झाल्यावर पोलिसांत रिपोर्ट करणे हे कर्तव्य आहे. पोलिसांनी वस्तुस्थिती तपासली पाहिजे, तो कार्यकर्ता म्हणतो भेटायचे आहे. कार्यकर्ता असेल किंवा नसेल, पण त्याची बाजू ऐकली पाहिजे, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT