ST bus driver 
महाराष्ट्र बातम्या

ST bus : तब्बल पाच वर्षानंतर महिलांच्या हाती एसटीचे 'स्टेअरिंग'; २८ महिलांनी मिळाली नियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात महिलांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर २०१९ मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत या महिला उमेदवारांचे प्रशिक्षण देण्यासह त्यांच्या भरती संबंधीत प्रक्रियेचा गोँधळ उडाला होता.

त्यामूळे महिला उमेदवारांना नियुक्तीसाठी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन सुद्धा करण्याची वेळ आली होती. मात्र, अखेर ३१ मे रोजी एकूण २०६ उमेदवारांऐवजी २८ महिला उमेदवारांना राज्यातील विविध विभागांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाने घेतलेल्या सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये २०१९ मध्ये २०६ उमेदवार पात्र झाले होते. त्यातील महिला उमेदवारांच्या नियुक्तीची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. त्यामध्ये ३१ मे पर्यंत एक वर्षांचे अवजड वाहन प्रशिक्षण सुरू असलेल्या महिला उमेदवारांची संख्या ९ असून, त्याप्रमाणेच एक वर्ष प्रशिक्षण पुर्ण करून प्राथमीक वाहन चालन चाचणी बाकी असलेले २४, ८० दिवसांचे प्रशिक्षण सुरू असलेले ७३ तर पुर्ण झालेले २० उमेदवार आहे.

त्याप्रमाणेच गैरहजर असलेल्या उमेदवारांची संख्या ४८ असून त्यांना भरती प्रक्रियेतून त्यांना एसटी महामंडळ प्रशासनाने अपात्र घोषीत केले आहे. तर चार उमेदवार अद्याप वैद्यकीय तपासणी करून नियुक्तीसाठी प्रलंबती असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Vande Bharat Train Route : मुंबई, पुणे, सोलापूर, बंगळुरू नवीन वंदे भारत, वेळ आणि पैसा वाचणार; जेवणाच्या बिलासह तिकीट

Train Stopped For Robbery Case : थरारक घटना! मानवत रोडवर सिग्नल यंत्रणा निकामी करून एक्स्प्रेस लुटली; महिला प्रवाशांचे दागिने लंपास

Latest Marathi News Live Update : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल नऊ लाख पोती हळद विक्री

हजार प्रयत्न करा पण...; सहरची सोशल मीडियावर पोस्ट, पण बाप-लेक दोघेही नॉट रिचेबल; बनावट जातीच्या दाखल्यामुळे अडचणीत

Avinash Jadhav: मराठी भाषेचा आदर प्रत्यक्षातही दिसायला हवा: मनसे नेते अविनाश जाधव, रिक्षाचालकांनी मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न करावा!

SCROLL FOR NEXT