Chitra Wagh Sakal
महाराष्ट्र बातम्या

हे शिवरायांचं राज्य! इथं दंडुकशाही चालणार नाही...: चित्रा वाघ

आंदोलनात विद्यार्थांना केलेल्या लाठीचार्जवरुन चित्रा वाघ यांची सरकारवर टीका

दत्ता लवांडे

मुंबई : सध्या राज्यभर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांचे ऑनलाइन परिक्षा घेण्यावरुन आंदोलन चालू आहे. तसेच विद्यार्थांचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या घरासमोर आंदोलन सुरु असताना पोलिसांनी विद्यार्थांवर लाठीचार्ज केला आहे. याप्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. (Student Protest In Maharashtra For Online Examination)

शासनाने दहावी आणि बारावीच्या परिक्षा जाहीर केल्या आहेत. ह्या परिक्षा ऑनलाइन होतील असं सरकारने म्हटलंय. परंतु अभ्यास ऑनलाइन झाला मग परिक्षाही ऑनलाइन झाल्या पाहिजेत अशी मागणी करत विद्यार्थांनी राज्यभर आंदोलन छेडले आहे. या प्रकरणात विद्यार्थांचे माथे भडकावल्याप्रकरणी विकास पाठक उर्फ 'हिंदुस्थानी भाऊ' याला पोलिसांना आज अटक केली आहे. विद्यार्थांचे हे आंदोलन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर चालू असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आहे. त्यावरुन चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत ''राज्यात हे चाललंय तरी काय? हे तालीबानी सरकार विद्यार्थांचा आवाज दाबू पाहतंय.'' अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी ''हे शिवरायांचं राज्य आहे इथं दंडुकशाही चालणार नाही..'' असे खडे बोलही सरकारला सुनावले आहेत. त्यांच्याबरोबरच या प्रकरणावर अनेक दिग्गज नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर विकास पाठक याला आज पोलिसांनी विद्यार्थांचे माथे भडकवल्याप्रकरणी अटक काली आहे त्यामुळे या आंदोलनामागे विकास पाठक आणि मोठ्या नेत्यांचा हात असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT