Sujat Ambedkar
Sujat Ambedkar Sujat Ambedkar
महाराष्ट्र

'राजकीय विषयावर बोलून आज कुणाचाही मूड खराब करायचा नाहीये'

सकाळ डिजिटल टीम

'राजकीय विषयांवर बोलणार नसून मला कोणाचाही मूड आज खराब करायचा नाही'

मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांचे नाव चांगलेचं चर्चेत आले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला त्यांनी प्रत्त्युतर दिले होते. औरंगाबाद येथे बोलताना त्यांनी दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान आज मी कोणत्या राजकीय विषयांवर बोलणार नसून मला कोणाचाही मूड आज खराब करायचा नाही, असं वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्याविषयी बोलायला नकार दिला आहे. आज नागपुर येथे चैत्यभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे यांच्या संदर्भात बोलायला त्यांनी नकार दिला. सुजात आंबेडकर म्हणाले, आज आंबेडकरी जनतेचा दिवस आहे. त्यामुळे आज या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. आजच्या दिवशी मला राजकीय विषयावर बोलून कोणाचाही मूड खराब करायचा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर लोकांना घराबाहेर पडण्याची संधी मिळाली आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस असल्यानं मला कोणाचाही मुड खराब करायचा नाही असेही ते म्हणाले. यावेळी टाटा इन्स्टिट्यूट संदर्भातील एका मुद्द्यावर विचारले असता ते म्हणाले, टाटा इन्स्टिट्यूटमध्ये मला बाबासाहेब आणि शिक्षण या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रण होत. तिकडचे विद्यार्थी हुशार आहेत. त्यांच्यासोबत बोलयला मला ते आवडलं असत. मात्र काही काळाने मला तेथे बोलण्याची परवानगी नाकारल्याचं समजलं आहे. हा निर्णय टाटा इन्स्टिट्यूट आणि विद्यार्थी यांचा आहे त्यामुळं मी यावर काही बोलू शकत नाही, असही त्यांनी स्पष्ट केलं.

रिपब्लिकन पक्ष किती असले तरी 2019 लोकसभा किंवा विधानसभेचा मतांचा आकडा पाहिला तर पक्षांच्या मागे एकाच गटातील नेते असले तरी तो पक्ष तिकडेच संपतो. त्यामुळे मत फुटत नाहीत. सगळे वंचित बहुजन आघाडीच्या मागे ताकदीने उभे आहेत. ही मत फुटत नाहीत हे मी डेटासहित बोलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. लोकशाहीत व्यक्ती स्वतंत्र असतो जसा धर्म, जात असा भेदभाव होऊ शकत नाही, तसाच वयाचाही भेदभाव होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT