Sunetra Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार बारामती लोकसभा निवडणूक लढवणार? अजित पवार यांनी दिले संकेत!

सुनेत्रा पवार: Will Sunetra Pawar contest the Baramati Lok Sabha elections?

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा जोरदार चर्चा सुरु आहेत. कारणही तसंच आहे. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवशी बारामती मतदारसंघात त्यांचे मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. यावर त्यांचा खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार का असा प्रश्न पडत आहे.

सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही विचार करु. वेळ येईल त्यावेळी त्या त्या गोष्टींचा विचार केला जाईल, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकतं, अशा प्रकारचे संकेत त्यांनी दिले आहेत.

वाढदिवसानिमित्त वारजे पुलावर सुनेत्रा पवार यांचे होर्डिंग लागले होते. त्यांच्या फोटोसोबत संसदेचे चित्र देखील दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा लढवतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार निवडणुकीसाठी उभ्या राहिल्यास सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळू शकते.

सुप्रिया सुळे यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, 'माझ्याविरोधात कोणीही निवडणूक लढवू शकतं.' दोन्ही गटाकडून सावध प्रतिक्रिया येत असल्याने सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा लढतीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्यावेळी काय चित्र निर्माण होतं हे पाहावं लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवारांनी अनेक आमदार आणि खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. यावरुन विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरु आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT