Sunil Tatkare sakal
महाराष्ट्र बातम्या

Sunil Tatkare : जागा निश्‍चितीसाठी ‘महायुती’ची समन्वय समिती;खासदार सुनील तटकरे : नाशिक जिल्ह्यातील अकरा जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीपेक्षाही महायुतीकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे तीनही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत एकमत व्हावे, याकरिता च समन्वय समिती स्थापन करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीपेक्षाही महायुतीकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे तीनही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत एकमत व्हावे, याकरिता च समन्वय समिती स्थापन करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असून इच्छुकांनी नाशिक पश्‍चिम, नाशिक मध्य, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर, बागलाण व नांदगावच्या जागांची मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

जनसंवाद यात्रेपूर्वी दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार तटकरे यांनी रविवारी मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवनात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की जनतेच्या मनातील रोष लोकसभा निवडणुकीत निघून गेला आहे. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच कौल मिळेल. तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जागा वाटपाच्या अनुषंगाने बैठक झाली. राज्यात एकत्रितपणे नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातूनही जागा वाटपासंदर्भात दोन दिवसांत चर्चा होणार आहे. स्वबळावर लढण्याचा प्रश्नच नसून चर्चेचा तपशील जाहीर केला जाईल. निवडून येण्याची क्षमता हा निकष असून जागा वाटपाबाबत कुठलेही मतभेद नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. सरकारच्या क्रांतिकारी योजनांमुळे प्रत्येकाच्या मनात आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

‘त्यांना’ अवघी १२ मते

विधान परिषदेच्यावेळी आमचे उमेदवार १०० टक्के पडणार, असे काहीजण बोलत होते. परंतु तसे झाले नाही. आमचे उमेदवार निवडून आले. परंतु त्यांच्या उमेदवारांना १२ मतांच्या पुढे जाता आले नाही, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता तटकरे यांनी लगावला. लाडकी बहीणऐवजी लाडकी बायको अशी योजना आणा, असे म्हणणारे जयंत पाटील यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका तटकरे यांनी यावेळी केली.

झिरवाळांची अनुपस्थिती

प्रदेशाध्यक्ष तटकरे जिल्हा दौऱ्यावर असतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपस्थित नव्हते. त्यांची अनुपस्थिती मेळाव्यात चर्चेचा विषय ठरली. याबाबत तटकरे म्हणाले, ‘‘उद्या दिंडोरीत सभा आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्याला झिरवाळ अपेक्षित नव्हते. ते उपस्थित नाहीत याचा अर्थ त्यांच्या मनात वेगळे काही आहे असा होत नाही. परंतु, अशा बातम्या पेरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे.’’

‘जनसंवाद’ यात्रा नाशिकमधून

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची ‘एन्ट्री’ होणार असून, जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT