Supriya Sule Esakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: पहाटेचा शपथविधी होणार हे माहित होतं का? सुप्रिया सुळे म्हणाल्या,'तेव्हा मी...'

सुप्रिया सुळेंनी पहाटेच्या शपथविधीविषयी बोलल्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी होऊन आता तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ उलटला आहे. मात्र तो शपथविधी राजकीय वर्तुळात अजूनही चर्चेत असतो. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. (Latest Marathi News)

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दोन दिवसांपूर्वीच यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांनी तेव्हा डबलगेम केला. सर्व गोष्टी ठरल्या होत्या पण त्याआधी शरद पवार यांनी माघार घेतली. तर शरद पवार यांनी यावर उत्तर देताना म्हंटलं की, आम्ही गुगली टाकली आणि ते आऊट झाले. यावर आता राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही आता प्रतिकीया दिली आहे.(Latest Marathi News)

२०१९ चा शपथविधीबाबत तुम्हाला माहिती होते का, यावर सुळे म्हणाल्या कि, “२०१९ चा शपथविधी? नाही त्यावेळी मला काहीच माहित नव्हतं. मी कशातच नव्हते. इतके डिटेल्स मला माहिती नव्हते. पहाटेच्या शपथविधीची बातमी मला सदानंद सुळे यांनी दिली. तेव्हा मी झोपले होते.” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)

पुढे त्या म्हणाल्या कि, 'मी त्यावेळी दादाशी नेता म्हणून आणि भाऊ म्हणून मी संपर्कात होते. आमच्या फॅमिलीतील सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. मी खरंतर देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. कारण ते खूप छान पद्धतीने बोलले. तीन दिवस आधी शरद पवारांनी मन बदललं, मग आम्ही शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनीच हे वास्तव मांडलं.(Latest Marathi News)

'शपथविधीच्या आधी तीन दिवस होते त्यामध्ये शरद पवार नव्हते हे देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलं आहे. दादाच्या मनात तेव्हा काय घालमेल झाली माहित नाही. मी कधी या विषयावर बोलले नाही. आता झालेल्या गोष्टी किती दिवस बोलणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काहीच विषय नसले तर ते शपथविधीचा विषय काढतात असा खोचक टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. झी २४ तास या वाहिनीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंची मुलाखत होती. त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Southwest Monsoon Withdrawal : महाराष्ट्रासह देशातून नैऋत्य मॉन्सूनची माघार; आता ईशान्य मॉन्सून सक्रिय, 'या' भागात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

Crime News: हिंगोली जिल्ह्यात धक्कादायक घटना; गर्भवती पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने घेतला गळफास

Diesel Supply Crisis : डिझेल टंचाईचे संकट गडद; दिवाळीनंतर दरवाढीची शक्यता, महागाईची आणखी झळ बसण्याची भीती

Marathi News Live Updates: दुष्काळाच्या झळांनी लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात, पाणी आणि चाऱ्याअभावी साडेचारशे म्हशींचा सांभाळ कठीण, पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ

Pune Bengaluru Highway Traffic : पुणे-बंगळूर महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी! हिरेबागेवाडी ते हालगा दरम्यान एकेरी वाहतूक सुरू; ऊस दराच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT