Vishalgad Controversy supriya sule  sakal
महाराष्ट्र बातम्या

Vishalgad Controversy: विशाळगडाच्या बाबतीत सरकारने...; सुप्रिया सुळेंनी केले महत्त्वाचे विधान!

Supriya Sule: सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे.

मिलींद संगई

Baramati Latest Update: राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे.

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्यांना काही गोष्टी सुचत आहेत, उशीरा का होईना गरीब कष्टक-यांसाठी ते जर काही करणार असतील तर त्याचे मी मनापासून स्वागतच करेन. सरकारने ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत, त्याचा लाभ समाजातील सर्वच पात्र व्यक्तींनी घ्यावा अशी माझी भूमिका आहे.

महायुतीचे सरकार आल्यानंतर गुन्हेगारी वाढल्याचे डेटा सांगतो, पूर्वी नागपूरमध्ये गुन्हेगारी जास्त होती, मात्र आता पुणे शहर व पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याचे नमूद करताना मला वेदना होत आहेत.

विशाळगडाच्या बाबतीत सरकारने काहीतरी एक धोरण नक्की करावे, आणि संवेदनशीलपणे यात निर्णय घ्यावा.

केंद्रीय अर्थसंकल्पाकडून आम्हाला फारशा अपेक्षा नाहीत कारण हे सरकार निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच अर्थसंकल्प मांडते, जुमलेबाज सरकार अशा शब्दात सुळे यांनी सरकारचे वर्णन केले. सामान्यांचे अधिकार काढून घेण्याचे काम सरकारकडून सुरु असून संविधानाच्या विरोधात बिल मांडले गेले आहे.

बॅनरसाठी परवानगी घ्यायला हवी..

कोणतेही बॅनर लावायचे असेल तर त्याला रितसर परवानगी घ्यायला हवी, अगदी माझेही लावायचे असेल तरी त्याला परवानगी घ्यायला हवी, राजकीय पक्षांनीही ती घ्यायला हवी, मी काही बॅनरबाजीच्या बाजूने नाही, सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येत या बाबत निर्णय घ्यायला हवा. असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT