Talathi Bharti Result 2023 Esakal
महाराष्ट्र बातम्या

Talathi Bharti Result 2023: तलाठी भरती २०२३ची निवड यादी जाहीर; निवड यादीसोबत प्रतिक्षा यादीही जाहीर

Talathi Recruitment 2023 Selection List Released: तलाठी भरती २०२३ची निवड यादी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर निवड यादीसोबत प्रतिक्षा यादीही जाहीर झाली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

तलाठी भरती २०२३ची निवड यादी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर निवड यादीसोबत प्रतिक्षा यादीही जाहीर झाली आहे. महसूल विभागाकडून जिल्हानिहाय यादी जाहीर झाली आहे.

राज्यातील २३ जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

१. रायगड, २. रत्नागिरी, ३. सिंधुदुर्ग, ४. मुंबई शहर, ५. मुंबई उपनगर,६. सातारा, ७. सांगली, ८. सोलापूर, ९. कोल्हापूर, १०. अकोला, ११. बुलढाणा, १२. वाशिम, १३. परभणी, १५. लातूर, १६. जालना, १७. वर्धा, १८. नागपूर, १९. गोंदिया, २०. भंडारा, २१. छ. संभाजी नगर, २२. धाराशिव, २३. हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश

निवडयादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्दीनंतर उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपुर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात येईल, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे

तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात ५७ सत्रांमध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेसाठी तलाठी पदासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

Latest Marathi News Live Update : बिबट्याची भीती, उन्हाचा तडाखा अन् गारपिटीचा फटका; मेंढपाळ अडचणीत

IPL 2026: ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनमुळे CSK संघात जाणवतोय धोका? माजी कर्णधाराचा खळबजनक दावा

Gemma 4 : इंटरनेटची गरज संपली! गुगलने लॉन्च केले Gemma 4; आता डेटा संपला तरी मोबाईल चालेल सुपरफास्ट, कसं वापरायचं पाहा

Gold Rate: सोनं 30 हजारांनी स्वस्त! चांदीही 1.6 लाखांनी घसरली; आता भाव वाढणार की अजून पडणार?

SCROLL FOR NEXT