Loksabha Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election: ठाकरे गट मावळची जागा लढविणार? लोकसभा निवडणुकीसाठी ‘मातोश्री’वरील आढावा बैठकीत चर्चा

महाविकास आघाडीतून मावळ मतदारसंघासाठी ठाकरे गट प्रयत्नशील असून, काल ‘मातोश्री’वर झालेल्या आढावा बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: महाविकास आघाडीतून मावळ मतदारसंघासाठी ठाकरे गट प्रयत्नशील असून, काल ‘मातोश्री’वर झालेल्या आढावा बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अमोल कोल्हे हे खासदार असल्याने मावळ मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटात गेले असल्याने महायुतीकडून शिंदे गट ही जागा लढवणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, ठाकरे गटाने या मतदारसंघावर आपला दावा कायम ठेवत मावळ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची ‘मातोश्री’ वर बैठक घेतली. या बैठकीत या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित करण्याबाबत चर्चा झाली.

आमदार सचिन अहिर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, की मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट उमेदवार देणार असून, आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय लवकरच होईल. पण ही जागा जिंकून आणण्याबाबतची चर्चा बैठकीत झाली. मावळमधून लढण्यासाठी शिवसेनेत आणि शिवसेनेबाहेरील अनेक लोक इच्छुक आहेत. काही आमच्या संपर्कातदेखील आहेत. त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः लवकरच बोलतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT